Viral Video of Waterfall Accident :अनेकजण पावसाळ्याचा आनंद लुटायला जातात पण योग्य काळजी न घेतल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो.
पावसाळा सुरू झाल्यापासून अशा अनेक घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनस्थळांना भेटी देताना नागरिकांकडून अनेकदा काळजी घेण्याचे आवाहन केले जाते.
मात्र अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करून स्वत:चा जीव धोक्यात घालतात.दरम्यान, धाब्यवरी येथील अपघाताचा एक नवीन व्हिडिओ चर्चेत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना धक्काच बसला.
सध्या सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत धोकादायक वाढ झाली आहे. घाटमाथ्यावरील मुसळधार पावसामुळे पर्यटकांनी अशा ठिकाणी न जाण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
डोंगरमाथ्यावर अनेकदा मुसळधार पाऊस झाला की पाण्याचा प्रवाह झपाट्याने वाढून सार्वजनिक वाहनांचे नुकसान झाल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत.
अशा वेळी लोक आपोआप घटनास्थळी जातात आणि स्वतःला धोक्यात घालतात.सध्या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहून शकता की कुटुंब धबधब्याच्या ठिकाणी अडकल्याचे दिसत आहे.
अचानक धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने आई पाण्याच्या प्रवाहाच्या एका बाजूला आणि वडील आणि मुलगी दुसर्या बाजूला अडकले आहेत.
दरम्यान, पाण्याचा प्रवाह इतरा जोरात आहे की कोणतीही व्यक्ती सहज वाहून जाईल. पाण्याच्या प्रवाहाच्या दुसर्या बाजूला जाण्याच्या नादात महिलेबरोबर जे घडायला नको तेच घडते.
दिसते की, महिला उडी मारून पाण्याचा प्रवाह ओलांडण्याचा प्रयत्न करते, तिचा पती हात पकडून तिला ओढण्याचा प्रयत्न करतो पण महिलेचा तोल जातो आणि ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाताना दिसत आहे.
व्हिडिओ कुठला आहे किंवा महिलेचा जीव वाचला की याबाबत माहिती मिळालेली नाही पण धबधब्याच्या ठिकाणी जाऊ आपला जीव धोक्यात का टाकू नये हाच बोध यातून मिळतो आहे.