नाद खुळा! जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याने काढला विविध प्राणी, पक्षांचा आवाज; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक

By Datta K

Published on:

Viral Video:15 ऑगस्ट रोजी देशभरात 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. या दिवशी तिरंगा ध्वज फडकावून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला.

सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये काही लोक सुंदर गाणी गाताना दिसत आहेत तर काहीजण गाणी गाताना दिसत आहेत.

नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये जिल्हा परिषद शाळेतील एक मुलगा असे काही करतो की तुम्हाला हसू येईल.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणारी मुले नेहमीच विविध कला सादर करताना दिसतात. ज्यामध्ये कधी लोक सुंदर नाचताना दिसतात, तर काही जण सुंदर भाषण करताना दिसतात.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुलगाही ही कला आदराने सादर करताना दिसत आहे.या स्वातंत्र्यदिनाच्या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, जिल्हा परिषदेच्या शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांमधील कलागुण सादर करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शाळेतील एक मुलगा व्हिडीओच्या सुरुवातीला हुबेहूब श्वानाच्या ओरडण्याचा आवाज काढताना दिसत आहे. यावेळी त्याचे हे सादरीकरण पाहून सर्व जण मोठमोठ्याने हसतात.

त्यानंतर तो कावळ्याचा, कोकिळेचा, शेळीचा अशा काही प्राण्यांचे आणि पक्षांचे आवाज काढून दाखवतो. मुलाचे हे सादरीकरण पाहून सर्व जण त्याच्यासाठी कडकडून टाळ्या वाजवतात.

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews