Viral video | हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

By Datta K

Published on:

Viral video | हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला

 

 

Viral video | सोशल मीडिया हे माहितीचं प्लॅटफॉर्म आहे, येथे आपल्याला फोटो आणि व्हिडीओ स्वरुपात माहिती मिळते. तर काही व्हिडीओ हे खूपच मनोरंजक असतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सोशल मीडिया हे माहिती आणि व्हिडीओचं भंडार आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. सध्या एक असाच मनोरंज व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्ही पोट धरुन हसाल. या व्हिडीओमधील तरुणानं असं काही केलंय की तुम्हीही डोक्याला हात माराल.

 

 

आजकालच्या बहुतांश तरुणांचं पहिलं प्रेम म्हणजे झोप. वेब सीरिज, चित्रपट किंवा इतर मनोरंजनाच्या माध्यमांनी तरुणाईला इतकी भुरळ घातली आहे की, हाती घेतलेलं काम तडीस नेल्याशिवाय झोपणार नाही असा निश्चय काही जण करतात. मग ही मंडळी रात्ररात्र जागरण करतात. कधी नाइट आऊटमुळे तर कधी एक्स्ट्रा कामाच्या व्यापामुळे झोपायला उशीर होतो आणि सर्वसामान्य लोकांच्या गुड मॉर्निंगच्या वेळी या तरुणांची गुड नाइट होते.

अनेकदा झोप अशी लागते की व्यक्ती जिंवत आहे की नाही हे समजणे कठीण जाते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका व्हिडिओची चर्चा होत आहे. ज्या एक व्यक्ती चक्क नदीतील पाण्यात झोपून जातो मात्र असा झोपतो की घटनास्थळी पोलिस आणि अन्य नागरिक भितीने जमा होतात.

 

पहा व्हिडिओ:

 

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक नदी सारखा परिसर दिसत आहे. एका बाजूला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी जमलेली आहे. व्हिडिओत पुढे पाहिले तर एक व्यक्ती पाण्यात तरंगताना दिसत आहे. अनेकांना तो व्यक्ती मृत असल्याचे वाटल्याने काही व्यक्ती पाण्यात उतरुन त्याच्या बॉडीला बाहेर काढण्यासाठी जातात मात्र त्याला उचलताच तो व्यक्ती जागा होतो.

खरं तर तो पाण्यात झोपला होता मात्र ही झोपण्याची पद्धत त्या व्यक्तीची वेगळीच होती. यावेळी पोलीस घटनास्थळी पोहचले आणि तरुणाला हाताला पकडून बाहेर काढणार तेवढ्यात त्यानं हात झटकला अन् पुढे जे घडलं ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हे दृश्य पाहून तिथे उभे असलेले लोक आणि पोलिसही चक्रावून गेले. पोलीस आणि गर्दी पाहून ती व्यक्तीही घाबरली.

 

पहा व्हिडिओ:

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews