Viral video | शेवटी हिशोब कर्माचा होतो” पोलिसानं गरीब रिक्षा चालकाबरोबर काय केलं पाहा VIDEO बघून डोळ्यांत येईल पाणी

By Datta K

Published on:

Viral video | शेवटी हिशोब कर्माचा होतो” पोलिसानं गरीब रिक्षा चालकाबरोबर काय केलं पाहा VIDEO बघून डोळ्यांत येईल पाणी

 

Viral video: ‘जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर’; आपण जे वागतो, बालतो तेच आपल्यासोबत घडतं हे आपण सगळ्यांनीच आतापर्यंत ऐकलं आहे. तुम्ही एखाद्याला त्रास दिला तर तुम्हालाही कुणीतरी त्रास देईल किंवा तुम्ही एखाद्यासोबत चुकीचं केलं तर उद्या किंवा एक दिवस तुमच्यासोबतही ते घडू शकतं. जसे करावे तसे भरावे अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेक जण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जातात आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते. याला आपण जसे कर्म तसे फळ असे म्हणतो.

 

अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, एखाद्याचे आपण वाईट करण्याचा विचार करतो आणि आपल्या बाबतीतही वाईटच घडते. पण याच उलट जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो, एखाद्यासाठी काहीतरी चांगलं करतो तेव्हा तेसुद्धा आपल्याला दु्प्पट मिळतं. मग आनंद असो वा दुख: आपण जे दुसऱ्यांना देतो तेच आपल्याला मिळतं, याचं ताजं उदाहरण देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका पोलीसाच्या कृतीचं सर्वत्र कौतुक होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

 

 

हा व्हिडीओ पाहताना सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की, हे पोलिस गरीबाला त्रास देत आहेत की काय. मात्र हे पोलिस दिवसभर रिक्षा चालवून थकलेल्या व्यक्तीला मदत करतात. ते त्याच्या रिक्षात बसतात आणि एका हॉटेलमध्ये घेऊन जातात. तिथे ते त्या गरीब व्यक्तीला पोलीस स्वत: घास भरवतात आणि ते सुद्धा खातात. यावेळी या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जे समाधान आणि आनंद आहे त्याची किंमत कशाचीही करु शकत नाही. कधी कधी आपण नकळत केलेली मदत एखाद्याला मोठा आनंद देऊन जाते हेच या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं.

 

पाहा व्हिडीओ:

⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

https://www.instagram.com/reel/DBmDJdRqrAF/?igsh=bWw2cGJkYnh4cTAx

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews