Viral video | इतक्या जवळून मृत्यू कधी पाहिलंय का तुम्ही घराच्या बाहेर येताच घडलं भयंकर; हृदय कमकूवत असेल तर हा व्हिडिओ पाहूच नका

By Datta K

Published on:

Viral video | इतक्या जवळून मृत्यू कधी पाहिलंय का तुम्ही घराच्या बाहेर येताच घडलं भयंकर; हृदय कमकूवत असेल तर हा व्हिडिओ पाहूच नका

 

Viral video | माणसाने इतके प्रचंड शोध लावले की, त्यापुढे थक्क व्हावे लागते. बैलगाडीपासून विमानापर्यंत गतीवर मात करणारी साधने माणसाने शोधून काढली. पण, शेवटी निसर्गापुढे तो हतबल आहे. निसर्गाच्या हल्ल्यांपुढे माणूस दुर्बल ठरतो. वीज त्याने घराघरातून खेळवली असली तरी आकाशातील वीज त्याच्यावर कोसळते तेव्हा भस्मसात होण्याखेरीज त्याच्या हाती काही नसते. माणूस दयावंत असतो; पण निसर्गाला दयामाया माहीत नसते. याचंच एक उदाहरण म्हणजे नुकताच झालेला निसर्गाचा आणखी एक प्रकोप. त्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

असं म्हणतात मृत्यू ही एकमेव गोष्ट आहे जी अटळ आहे. म्हणजे तुम्ही काहीही करा पण जर तुमच्या नशिबात मृत्यू लिहिलेला असेल तर तो स्वत: तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो. अन् याचिच प्रचिती देणारा एक व्हिडीओ समोर आला. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की एखाद्या अपघातात किंवा एखाद्या घटनेत थोडक्यात कुणीतरी बचावतं, अशावेळी मृत्यू जवळून पाहिला किंवा मृत्यूला चकवा दिला असं म्हणतात. पण हाच मृत्यू तुम्ही कधी जवळून पाहिलाय का? नाही ना मग हा व्हिडीओ पाहा. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्हाला सुद्धा धक्काच बसेल. मृत्यूचा हा खेळ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सर्वत्र अंधार व्हायला सुरुवात झाली आहे आणि मुसळधार पाऊस वारा सुटला आहे. अशातच एक व्यक्ती त्याच्या घराबाहेरील अंगणात उभा राहून मोबाईलमध्ये व्हिडीओ काढत आहे. तेवढ्यात अचानक मोठी वीज त्याच्या जवळच काही अंतरावर कोसळते, सुदैवानं हा व्यक्ती मागे हटल्यामुळे बचावतो. मागे टाकलेल्या एका पावलामुळे या व्यक्तीचा जीव वाचला मात्र स्वत:चा मृत्यू इतक्या जवळून पाहिल्यामुळे हा व्यक्ती फारच घाबरला होता. पावसाच्या काळात वीज चमकत असताना झाडांच्या आडोशाला थांबल्यानं किंवा घराबाहेर पडल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत सतर्कता बाळगणं आवश्यक आहे.

 

पाहा व्हिडीओ

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews