Viral video | नवरा बायकोचा प्रेम बायको, तू फक्त साथ दे खरं प्रेम काय असते हे जिवंत उदाहरण दाखविणारा व्हिडिओ पाहून कराल कौतुक 

By Datta K

Published on:

Viral video | नवरा बायकोचा प्रेम बायको, तू फक्त साथ दे खरं प्रेम काय असते हे जिवंत उदाहरण दाखविणारा व्हिडिओ पाहून कराल कौतुक 

 

Viral Video: “तू फक्त साथ दे, अख्खं आयुष्य सुंदर बनवू”, असं म्हणणारा जोडीदार प्रत्येक व्यक्तीला त्याच्या आयुष्यात हवा असतो. खरंच प्रेम ही एक खूप सुंदर आणि निर्मळ भावना आहे. आपल्या आधीच्या पिढीसाठी प्रेम केवळ अपेक्षा पूर्ण करणं नसून

एकमेकांच्या सुख-दुःखांत एकमेकांना साथ देणं, परिस्थिती समजून घेणं, कधीतरी आपल्या जोडीदारला एखादी गोष्ट आवडते म्हणून त्याच्यासाठी ती आवडीनं करणं, याला खरं प्रेम म्हणतात. पण, हल्लीचा

बदलणारा काळ बघता, प्रेम, लग्नं फार काळ टिकत नाहीत आणि त्यामुळे ते दोघं एकमेकांना आयुष्यात कितपत साथ देतील हे सांगता येत नाही.

दरम्यान, आता एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक आजी-आजोबा आयुष्यातील सुंदर क्षण जगताना दिसत आहेत.

 

आजी-आजोबांचं अतूट प्रेम

 

अनेकदा सोशल मीडियावर वृद्ध जोडप्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यामध्ये त्यांचे प्रेम पाहून आपल्यालाही हेवा वाटतो.

या व्हायरल व्हिडीओमध्येदेखील असंच प्रेम पाहायला मिळतंय, जे पाहून अनेक जण व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.

 

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वृद्ध जोडपं एकमेकांचा हात हातात घेऊन जिना चढण्याचा प्रयत्न करीत आहेत.

यावेळी दोघांनी एकमेकांचा हात घट्ट पकडला असून दोघेही एकमेकांना सावरत जिना चढत आहेत. दोघांमधील हे प्रेम पाहून सोशल मीडियावर अनेक लोक कमेंट्स करताना दिसत आहेत.

 

पाहा आजी आजोबांचं व्हिडीओ:

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews