Viral video | अरे बाप भंगार एकूण घेतला iPhone: 12 महिने भंगार गोळा करतो’, पठ्ठ्याने घेतला झटक्यात दोन iPhone; म्हणाला, ‘पोराला पण घेऊन दिला

By Datta K

Published on:

Viral video | अरे बाप भंगार एकूण घेतला iPhone: 12 महिने भंगार गोळा करतो’, पठ्ठ्याने घेतला झटक्यात दोन iPhone; म्हणाला, ‘पोराला पण घेऊन दिला

 

आयफोन १६ लाँच झाल्यापासून अनेक मोबाइलवेड्या चाहत्यांची आयफोन घेण्यासाठी धडपड दिसून आली. मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील आयफोन स्टोअरमध्ये १६ ते १८ तास रांगेत उभं राहिल्यानंतर आयफोन विकत घेतलेल्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले. विशेषतः तरूणांमध्ये आयफोनचं प्रचंड वेड आहे.

पण आयफोनचं वेड हे तरूण, कटेंट क्रिएटर्स, प्रोफेशनल्स यांच्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. तर भंगार गोळा करणाऱ्या एका व्यक्तीलाही आयफोनची भुरळ पडली आहे.

या व्यक्तीने तब्बल दोन महागडे आयफोन विकत घेतले आहेत. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

एक्सवर पराग आगाशे नामक अकाऊंटवरून सदर व्हिडीओ पोस्ट झाला. त्यानंतर आणखी काही जणांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमधील व्यक्ती स्वतःला भंगार गोळा करणारी आहे,

असे सांगते. तसेच व्हिडीओ ज्यांनी काढला, त्यांनी या व्यक्तीला काही प्रश्न विचारले. त्याची अतिशय गमतीदार उत्तरं दिल्यामुळं हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

 

काय आहे व्हिडीओमध्ये

कपड्यांवरून गलितगात्र असलेल्या एका व्यक्तीच्या हातात नवा कोरा आयफोन पाहिल्यानंतर काही जणांनी त्याचा व्हिडीओ काढत, सदर आयफोन कुठून आणला? असा प्रश्न विचारला.

तू काय काम करतो, असा प्रश्न व्हिडीओ काढणाऱ्यांनी विचारला. त्यावर व्हिडीओतील व्यक्ती म्हणाला की, मी १२ महिने भंगार गोळा करतो. काच, बाटली, प्लास्टिक गोळा करतो.

 

तू मोबाइल कितीला घेतला? असाही प्रश्न त्याला विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, “हा ८५ हजाराला घेतला. आणखी एक मुलाला घेतला आहे, तो एक लाख ८० हजारांचा आहे. पोराला म्हणालो होतो, तू दहावीला चांगले मार्क आण,

तुला आयफोन घेऊन देतो. त्यानेही जिद्दीने अभ्यास केला आणि ८९ टक्के मार्क्स मिळविले” यानंतर व्हिडीओ काढणारे लोक या व्यक्तीला कुठे राहतो, असे विचारतात. त्यावर तो म्हणतो की, कर्वेत रहातो.

 

सदर व्यक्ती मराठी बोलत असला तरी तो नेमका कुठला आहे? हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. तसेच या व्हिडीओची सत्यता अद्याप पडताळता येऊ शकलेली नाही.

पहा काय आहे व्हिडिओमध्ये

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews