viral video | काकांनी केला जबरदस्त डान्स! डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन काकांनी धरला ठेका, कोकणातील गणरायाच्या विसर्जनाचा VIDEO पाहून कराल कौतुक

By Datta K

Updated on:

viral video | काकांनी केला जबरदस्त डान्स! डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन काकांनी धरला ठेका, कोकणातील गणरायाच्या विसर्जनाचा VIDEO पाहून कराल कौतुक

Anant Chaturdashi viral video of Ganapati visarjan dance:७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आणि काल म्हणजेच १७ सप्टेंबरला आपल्या लाडक्या बाप्पाला सगळ्या भक्तांनी निरोप दिला

११ दिवस अनेकांच्या घरोघरी, मंडळांमध्ये विराजमान झालेल्या या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकाही अगदी जल्लोषात पार पडल्या. बाप्पाला निरोप देताना नाचत-गाजत मिरवणूक काढत ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असा एकच जयघोष भाविकांनी केला.

 

मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ढोल-ताशे, बॅंजो, डीजे यांच्या तालावर अनेक जण अगदी बेभान होऊन नाचले. कोकणातही अगदी वाजत-गाजत बाप्पाची मिरवणूक काढली गेली.

हेही वाचा

बाप्पाच्या विसर्जनाची अनोखी पद्धत! माणसाने गणरायाच्या मूर्तीसह विहिरीत मारली उडी अन्…, VIDEO पाहून व्हाल अवाक

 

गणेशोत्सव म्हणजे कोकणकरांचा जिव्हाळ्याचा सण. वर्षभर मुंबईत नोकरी करणारे चाकरमानी सुट्टी काढून आर्वजून गणेशोत्सव काळात कोकणात जातात.

बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत आरती, भजन, गौरीदरम्यान अनेक खेळ खेळले जातात तसेच लोककलाही सादर केली जाते.

आता कोकणातला विसर्जनाच्या मिरवणुकीतला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओत चक्क डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन एक काका थिरकताना दिसतायत.

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्हिडीओत एक काका डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन थिरकताना दिसतायत. मूर्तीला हात न लावता, काकांनी ती डोक्यावर अगदी

उत्तमरीत्या पेलवून घेतली आहे. या काकांच्या मागेदेखील डोक्यावर मूर्ती घेणाऱ्या भाविकांची गर्दी जमली आहे. ‘बाप्पा मोरया रे’ या गाण्यावर बॅंजोच्या तालावर काका ठेका धरताना दिसतायत.

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews