Viral Video:पावसाळ्याचा आनंद लुटण्यात काहीच गैर नाही, पण योग्य ती खबरदारी न घेता धबधब्याला जाणे किंवा समुद्राजवळ जाणे एखाद्याचे आयुष्य खराब करू शकते.
पुणे, लोणावळा, ताम्हिणीजवळ झालेल्या अपघाताची आजही सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळेच धबधब्यासारख्या ठिकाणी जाताना सावधगिरी बाळगावी, धोकादायक ठिकाणी जाऊ नये, से वारंवार आवाहन केले जाते, पण लोक काहीही सोडत नाहीत.
धबधब्यावर भिजण्यासाठी गेला अन् पाय घसरून पडला
व्हायरल व्हिडीओमध्ये काही लोक धबधब्यालाखाली मजा घेताना दिसत आहेत. पाण्याचा प्रवाह सुरळीत आहे पण तिथले सगळे दगड ओले झालेले आहेत.
दरम्यान ओल्या दगडांवर एक तरुण बिनधास्तपणे चालताना दिसतो. ओल्या दगडांवरून घसरू नये म्हणून तरुण कोणतीहीच काळजी घेत नव्हते शेवटी जे व्हायला नको तेच झाले.
तरुणाचा पाय घसरला आणि तो जोरात खाली दगडावर आपटला. एवढच नाही तर निसरड्या दगडांवरून तो घसरत खाली गेला. तो जिथे पडतो तिथे खाली काही तरुणी धबधब्यांसमोर फोटो काढत उभ्या असतात.
अचानक हा तरुण वरून घसरत खाली आल्याने एका तरुणीला जाऊन जोरात धडकतो ज्यामुळे दोघेही तिथे साचलेल्या पाण्यात पडतात. सुदैवाने दोघांचा जीव वाचतो.
https://www.instagram.com/reel/C97ZtciP2ha/?igsh=MXB0M3FrcWp0NGw3Zw==