video viral | आता हा कोणता प्रकार बाईईई लावणीवर ठेका धरणाऱ्या गौतमी पाटीलला गरबा येतो का व्हिडिओ बघून तुम्हीच सांगा

By Datta K

Published on:

video viral | आता हा कोणता प्रकार बाईईई लावणीवर ठेका धरणाऱ्या गौतमी पाटीलला गरबा येतो का व्हिडिओ बघून तुम्हीच सांगा

 

 

Gautami patil garaba video goes viral: शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. या दिवशी लोक दांडिया आणि गरबा खेळतात आणि देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात. या सगळ्यात जो विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो, तो गरबाही नवरात्रीत खेळला जातो. खरं तर, तरुणाईला गरब्याची आवड असते. अगदी गरबा खेळण्यासाठीही ते जातात. मनसोक्त गरबा खेळतात. मोठमोठे सेलिब्रिटीही गरब्याचा आनंद लुटण्यासाठी गरबा खेळायला जातात. दरम्यान, एरवी लावणीच्या ठेक्यावर नाचणारी गौतमी आता गरबा खेळताना दिसलीय. नृत्यांगना गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा की, लावणीवर ठेका धरणाऱ्या गौतमी पाटीलला गरबा दांडिया खेळता येतो का?

 

 

सबसे कातिल गौतमी पाटील’, असे म्हणत महाराष्ट्रातल्या तरुणाईने लावणी डान्सर गौतमी पाटीलला अक्षरक्षः डोक्यावर घेतलं आहे. ती कायम सर्वत्र चर्चेत असते. गौतमीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

नृत्याची आवड जपत गौतमीने सर्वांच्या मनावर राज्य केलं आहे. गौतमी हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. संपूर्ण महाराष्ट्रात गौतमीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

एवढंच नाही, तर मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रिटी म्हणूनदेखील गौतमीने स्वतःची ओळख तयार केली आहे. याच गौतमीचा आता लावणीचा नाही, तर गरबा खेळतानाचा व्हिडीओ पाहून सगळेच अवाक् झाले आहेत.

 

 

 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गौतमी पाटील गरबा खेळत आहे. यावेळी तिनं साडी नेसली असून तिच्या हातात दांडिया दिसत आहेत. ती लहान मुलांसोबतही दांडिया खेळताना दिसत आहे. नेहमीच लावणी करताना दिसणारी गौतमी दांडिया खेळताना दिसल्यानं अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गौतमीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. अकलूज लावणी महोत्सवात तिनं पहिल्यांदा लावणी केली. आणि तिला तिथे ५०० रुपये मानधन मिळालं होतं. त्यानंतर गौतमीनं या क्षेत्रात भविष्य घडवायचं ठरवलं आणि तिथूनच गौतमीचा खरा प्रवास सुरू झाला.

सुरुवातीला ती बॅकडान्सर म्हणून काम करायची. त्यानंतर गौतमीनं पुणे आणि कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त शो केले. प्रेक्षकांकडून तिला दिवसेंदिवस अधिक प्रेम मिळू लागलं. तिचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. त्यामुळे गौतमी महाराष्ट्रभर लोकप्रिय झाली.

 

पाहा व्हिडीओ

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews