Shocking video | आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल

By Datta K

Published on:

Shocking video | आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल

 

 

unhygienic vegetables video : सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, असं म्हणत आपण आहारात सर्व भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा विचार करीत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे. कारण- भाजी मंडईभोवती अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालेभाज्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असून, ग्राहक भाजी घेतात की आजार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. इथपर्यंत ठीक होतं; मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून भाज्या थेट आता शेतातूनच आणायच्या का, असा सवाल उपस्थित होतोय. कारण- आता विक्रेते बाजारात बनावट भाज्याही विकत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये गृहिणीने सोललेले वाटाणे विकत आणले होते, त्याचं शिजवल्यानंतर काय झालं पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्ही वाटाणे घेताना १०० वेळा विचार कराल हे नक्की…

 

मटार फक्त थंडीच्या दिवसात येतात, म्हणून ते टिकवण्यासाठी लोक फ्रीझरमध्ये मटार ठेवतात किंवा फ्रोजन मटार वापरतात. ज्यामुळे तुम्ही वर्षाच्या कोणत्याही वेळी मटार खाण्याचा आनंद घेऊ शकता. परंतु यामध्ये तुमची कशी फसवणूक होऊ शकते हे या व्हिडीओमध्ये पाहा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही महिला तिच्याबरोबर कशी फसवणूक झाली हे सांगत आहे. या महिलेने बाजारातून सोललेले वाटाणे आणले होते. आपल्याला माहितीये ताजे वाटाणे हे हिरवेगार असतात. असेच हिरवे गार वाटाणे महिलेने कुकरमध्ये शिजायला ठेवले, मात्र कुकर जेव्हा उघडला तेव्हा महिलेला धक्काच बसला. कारण हे पांढरे वाटाणे होते, आणि त्याला रंग देऊन विकले होते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कुकरमध्ये हिरव्या रंगाचं पाणी दिसत आहे. अशाप्रकारे रंग वापरुन विक्रेत्यांनी नागरिकांच्या जिवाचा खेळ मांडला आहे.

 

 

बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाह. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

 

पाहा व्हिडीओ

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews