‘सेल्फी’ काढत असताना तरुणी २५० फूट दरीत कोसळली; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, रेस्क्यूचा थरारक VIDEO

By Datta K

Published on:

Satara News:एके दिवशी मोबाईलच्या दुनियेजवळ अशी रील बनवण्याचे निष्पाप धाडस असूनही अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

काही दिवसांपूर्वी इन्फ्लुएन्सर अन्वी कामदार हिचा रायगड जिल्ह्यातील ३०० फूट दरीत कोसळून मृत्यू झाला होता. दरम्यान, साताऱ्यातही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.

सेल्फीच्या नादात तरुणी २५० फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेचा सध्या समोर आलेला थरारक व्हिडीओ पाहून तुमचीही झोप उडेल. बदलत्या जगात सोशल मीडियावर सक्रिय राहणे ही काळाची गरज बनत चालली आहे.

प्रत्येक जण हा सोशल मीडियावर सक्रिय आहे. मग ते प्रत्येक क्षणाचे फोटोज सोशल मीडियावर टाकणे असो किंवा वारंवार सेल्फी काढणे असो.

कधी कधी आपण लाइक्स आणि व्ह्युजच्या नादात अशा काही करामती करतो की, ज्यामुळे आपल्याला इतर अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये एखाद्या वेळी आपला जीवही जाऊ शकतो.

सेल्फी काढताना मुलगी २५० फूट दरीत कोसळली

सज्जनगड-ठोसेघर परिसरातील बोरणे घाटात आज एक युवती डोंगराच्या कडेला सेल्फी काढताना तोल जाऊन २५० फूट खोल दरीत कोसळली.

सुदैवाने ती ४० फुटांवरच एका झाडीत अडकली आणि त्यामुळे पुढचा अनर्थ टळला. ट्रेकर्समुळे तिला दुसरं आयुष्य मिळालंय. सज्जनगड-ठोसेघर मार्गावरील बोरणे गावाच्या हद्दीतील ‘मंकी पॉईंट’ परिसरात एक युवती सेल्फी काढत होती.

यावेळी ही दुर्घटना घडली. सातारा शहरानजीकच्या डोंगर भाग परिसरातील हा दुसरा अपघात आहे. ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समिती व सातारा तालुका पोलिसांनी वेगाने बचावकार्य राबवून दरीत पडलेल्या युवतीला वाचवले.

त्या युवतीला महाबळेश्वर टेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने सहिसलामत बाहेर काढून साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

https://www.instagram.com/reel/C-N-aMcOp7a/?igsh=MTR2ZnVwd3oybjN2ZQ==

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews