Old Pension Scheme:सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत (एनपीएस) केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनच्या लाभात सुधारणा प्रस्तावित केली आहे.
सूत्रांनुसार, सध्याची मार्केट- बेस्ड रिटर्न सिस्टिम बदलून अंतिम मूळ वेतनाच्या ५०% पर्यंत रक्कम निश्चित पेन्शन म्हणून देण्याचा प्रस्ताव आहे.
पेन्शनरचा मृत्यू झाल्यास जोडीदारास हमीपात्र रकमेच्या ६०% मासिक पेन्शन देण्याचीही तरतूद होऊ शकते.
सरकारने मार्च २०२३ मध्ये पेन्शन बेनिफिटमध्ये सुधारणांसाठी नेमलेल्या समितीने अहवाल सादर केला आहे.
याच्या बहुतांश शिफारशी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर आहेत. आंध्र प्रदेश हमीपात्र पेन्शन सिस्टिम अधिनियम २०२३ अंतर्गत जिथे अॅन्युइटी
कमी पडते तिथे अंतिम मूळ वेतनाच्या ५० टक्के पेन्शन म्हणून मिळावी, हे एक टॉप-अप सुनिश्चित करते.
यामध्ये सेवेची वर्षे आणि पेन्शन फंडातून पैसे काढण्याच्या आधारे समायोजन केले जाईल.
हमीपात्र पेन्शन रक्कम पूर्ण करण्यासाठी पेन्शन फंडातील कमतरता केंद्राच्या अर्थसंकल्पातून पूर्ण केली जाईल
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा