New Traffic Rules 2024:अलीकडे अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने दिसू लागली आहेत.भरधाव अल्पवयीन दुचाकीचालकांमुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे.
पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष द्यावे, त्यांच्या हाती वाहने देऊ नये, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते. शिवाय “तीन वर्षे कारावासाची शिक्षाही होऊ शकते.
अल्पवयीन मुलांच्या हाती बिनधास्त वाहने दिली जात असून, अशा मुलांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
मोठी बातमी राज्यातील सर्व जनतेला टोल माफी जाहीर | Toll Tax Free News
याबाबत पालकांमध्येही मोठ्या प्रमाणावर बेफिकरी वाढू लागली आहे. तिरोडा वाहतूक शाखेने अल्पवयीन चालकांवर करडी नजर ठेवली आहे.
१८ वर्षांपेक्षा कमी वय असलेली मुले वाहन चालविताना आढळल्यास पालकांवर किंवा वाहन मालकावरच कारवाईच्या बडगा उगारण्यात येणार आहे.
तर पालकांना २५ हजारांपर्यंत दंड अन् कारावास
अल्पवयीन मुलाला वाहन चालविताना पकडल्यास पालकांवर कारवाई करण्यात येते.
पालकांना २५ हजारांचा दंड व तीन वर्षापर्यंत कारावासही होऊ शकतो. ही बाब पालकांनी लक्षात घ्यावी.
१८ वर्षे पूर्ण झाल्यावरच चालवा वाहन
अण्णासाहेब पाटील आर्थिक मंडळ मार्फत,1 लाखाचे बिनव्याजी कर्ज मिळणार
■ अल्पवयीन मुलांनी वाहन चालविणे मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा आहे.
त्यामुळे वयाची १८ वर्षे * पूर्ण झाल्यावरच वाहन चालविणे आवश्यक आहे.
पालकांनी आपल्या पाल्यांना ही बाब सांगण्याची गरज आहे.
अल्पवयीन वाहनचालकांची संख्या वाढली
• तालुक्यासह शहरात अल्पवयीन वाहनचालकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
अल्पवयीन वाहन चालकांमुळे अनेकदा अपघात घडताना दिसून येत आहेत.
पोलिसांनी अशांवर कारवाई करण्याची गरज आहे. अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढल्यास त्यांना दंड होतो.
मुलांकडे असलेले वाहन ज्याच्या मालकीचे असेल त्या पालकांना किंवा मालकालाही दंड ठोठवला जातो.