MSRTC Bus Reservation :नमस्कार मित्रांनो, आता MSRTC Bus Reservation या मोबाइल ॲपच्या माध्यमातूनही प्रवाशांना तिकीट काढता येते. त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत.
एसटी महामंडळाची सेवा ही आता अधिकाधिक
डिजिटली होऊ लागली आहे. घरबसल्या एसटीचे तिकीट काढण्यासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावरून तिकिटाचे ऑनलाइन आरक्षण करू शकता.
त्याचबरोबर आता MSRTC Bus Reservation या मोबाइल ॲपच्या माध्यमातूनही प्रवाशांना तिकीट काढता येते. या दोन्ही पद्धतीद्वारे तिकीट काढण्याच्या प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल केला आहे.
संकेतस्थळ आणि ॲप हे अद्ययावत केले आहे. सध्या या ऑनलाइन आरक्षण प्रणालीव्दारे एसटीची दररोज 10 हजार तिकिटे काढली जात आहेत.
1) संकेतस्थळ आणि मोबाइल ॲप वापरण्यास सोपे व सुलभ आहे. या दोन्हींच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला सन्मान योजना, दिव्यांगांना विविध सवलतींचे आगाऊ आरक्षण मिळू शकते.
2) यासाठी महामंडळाने npublic.msrtcors.com या संकेतस्थळाबरोबरच MSRTC Bus Reservation ॲपचा वापर प्रवाशांनी करावा, असे आवाहन केले आहे.
3) ऑनलाइन आरक्षण करताना प्रवाशांना तांत्रिक अडचण आल्यास त्यांनी 7738087103 या क्रमांकावर संपर्क साधावा. ही सेवा 24 तास सुरू असते.
4) ऑनलाइन आरक्षण करताना पैसे भरून तिकीट न येणे (पेमेंट गेट वे संदर्भात) या तक्रारींसाठी 0120-4456456 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येतो.
तिकीट विक्रीत वाढ
खासगी गाड्यांच्या तुलनेत एसटी बसगाड्यांच्या सेवा अधिक चांगल्या असाव्यात, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवनेरीसारख्या गाड्या एसटीने रस्त्यावर उतरविल्या आहेत.
ऑनलाइनद्वारे 1 जानेवारी 2024 ते 20 मे 2024 पर्यंत 12 लाख 92 हजार तिकिटांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच काळात 9 लाख 75 हजार तिकीट विक्री झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या सुमारे तीन लाखांनी जास्त आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा