Maharashtra Assembly Election 2024:राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २० सप्टेंबरला लागू होऊ शकते असे संकेत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिले.
ऑक्टोबर अखेरपर्यंत विधानसभेची निवडणूक होणार असल्याने २० सप्टेंबरला त्याची घोषणा होईल.
त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहन त्यांनी पक्षाच्या मेळाव्यात केले.
लोकसभा निवडणुकीनंतर ३ ते ४
महिन्यांतच विधानसभेची निवडणूक होणार आहे. कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीतील अपयश विसरून कामाला लागावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.
त्यापाठोपाठ चंद्रकांत पाटील यांनीही कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले.
सर्वसामान्य जनतेसाठी राज्य सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत.
त्याची माहिती घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केले.
इतर महत्वाची माहिती येथे क्लिक करून पाहा