Ladki Bahin Yojana Increase Amount :राज्याची लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमांमध्ये बोलताना सांगितले की राज्यातील महिला माझ्या लाडक्या बहिणी यांचे राज्याच्या विकासात मोठे योगदान आहे.
राज्यातील महिला भगिनींना आर्थिक लाभ मिळावा यासाठी जे जे करावे लागेल त्यासाठी आपले युती सरकार ते कामे करणार आहे.
मोठी बातमी माझी लाडकी बहीण योजना माहे जुलै ऑगस्ट ची संपूर्ण लाभार्थी यादी जाहीर
जशी महायुती सरकारची ताकद वाढत जाणार तसेच आपण सुरू केलेली लाडकी बहिणी योजना हप्त्याच्या रकमेमध्ये देखील वाढ करण्यात येणार आहे असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी मीडियाशी बोलताना सांगितले.
उमेद अभियानामध्ये काम करणाऱ्या महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांची शासकीय निवासस्थान असलेले वर्षा या बंगल्यावर ती जाऊन रक्षाबंधनानिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांना राखी बांधली.
BSNLचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन,फक्त 100 रुपयात 1 वर्षाचा पॅक कॉलिंग,डेटा अन् वेगवेगळ्या सुविधा
उमेदच्या माध्यमातून राज्यातील ४० हजार गावांतून मुख्यमंत्री शिंदे यांना एक कोटी राख्या पाठविण्यात येणार आहेत.
लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता राज्यातील महिलांना रक्षाबंधनाच्या अगोदर त्यांच्या खात्यावरती जमा व्हावा अशी आमची इच्छा होती व ती आम्ही पूर्ण केली आहे.
राज्यातील १ कोटी ४ लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत.
तसेच बाकी असलेल्या महिलांच्या खात्यावरती देखील थोड्या दिवसात आधार सीडिंग व इतर तांत्रिक अडचणी दूर करून महिलांच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
या लाडक्या बहिणीच्या खात्यावर थेट 4500 रुपये होणार जमा