Ladki Bahin Yojana Bank Account:राज्यामध्ये लाडकी बहीण योजना करता अर्ज करण्यात येत आहे पण मात्र अर्ज करणाऱ्या महिलांना बरेच प्रश्न पडले आहेत.
अर्ज करण्यासाठी महिलांना अनेक प्रश्न पडलेले आहेत. शासनाने या योजनेचे तीन वेळा नवीन GR निर्गमित करून योजनेत बदल केले आहेत.
लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना बँक खाते जोडताना फक्त आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते जोडा.
लाडकी बहीण योजनेचे पैसे डीबीटी द्वारे डायरेक्ट महिलांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याने ज्या खात्याला आधार लिंक आहे तेच खाते द्यावे.
आपल्या आधार कार्डशी कोणती बॅंक लिंक आहे हे चेक करण्यासाठी खालील स्टेप बाय स्टेप प्रोसेस पुर्ण करा.
तुमच्या आधार कार्ड कोणते बँक खाते लिंक आहे तेथे क्लिक करून पहा
1) आपले आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम आधारच्या अधिकृत वेबसाइटवर जा. (https://uidai.gov.in/).
2) माझा आधार या पर्यायावर क्लिक करा.
3) ड्रॉप-डाउन मेनूमधून आधार सेवा निवडा.
4) आधार आणि बँक खाते लिंकिंग स्थिती तपासा वर क्लिक करा.
5) तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला आधार लिंक मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी टाका.