Increase in DA | नवरात्री पूर्वी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात मोठी वाढ जाणून घ्या नवीन अपडेट
केवळ केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे, तर बँक कर्मचाऱ्यांसाठीही आनंदाची बातमी आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) च्या माध्यमातून बँक कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सरकारी परिपत्रकानुसार, मे २०२२ ते जुलै २०२४ या कालावधीसाठी बँक कर्मचारी आणि अधिकारी यांचा महागाई भत्ता त्यांच्या पगाराच्या १५.९७% असेल. या निर्णयामुळे बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.