IMD Heavy Rain Alert Today:राज्यात गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर मंदावला गेला आहे पण मात्र आता राज्यांमध्ये वातावरण बदलले असून पुढील येत्या काही तासात पावसाचे स्वरूप कसे असणार आहे याविषयी भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
या बातमीमध्ये आपण राज्यामध्ये पावसाची सध्याची स्थिती व येथे आठवड्याचा हवामान अंदाज याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
लडकी बहीण योजनेचे सर्व अर्ज मंजूर,यादीत आपले नाव पहा
पाठीमागील काही आठवड्यातील पावसाची स्थिती पाहू
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यातील बहुतांश भागांत जोरदार पाऊस झाला.
या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला.
मात्र आता पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले असून, राज्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
भारतीय हवामान खात्याचा ताजा अंदाज: भारतीय हवामान खात्याने पुढील चार दिवसांसाठी नवा हवामान अंदाज व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार:
राज्यामधील बऱ्याच भागांमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे.
दिनांक 10 ऑगस्ट 2024 पासून सोमवारपर्यंत विदर्भ वगळता राज्यातील उर्वरित भागांमध्ये पावसाची विश्रांती असणार आहे.
यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
विदर्भ विभागात येत असलेल्या अकरा जिल्ह्यांना आता दिला गेला आहे हा कालावधी दिनांक 10 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान असणार आहे या कालावधीमध्ये विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे.
मोठी बातमी महाराष्ट्रात होणार नवीन 22 जिल्ह्याची निर्मिती नवीन जिल्ह्याची यादी | New District List Maharashtra
या जिल्ह्यांमध्ये वर्धा, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती, वाशिम, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि गडचिरोली यांचा समावेश आहे या जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच राज्यातील इतर बाकी असलेल्या जिल्ह्यात कमी प्रमाणात पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
राज्याचे ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव डक यांनी पुढील दहा दिवसाचा हवामान अंदाज व्यक्त केला आहे.
दिनांक 11 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी-अधिक प्रमाणात पडण्याची शक्यता आहे.
या कालावधीत राज्यात सर्वत्र ढगाळ वातावरण राहील.
काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो.