Crop Compensation Benefits 2024:राज्यात जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत विविध जिल्ह्यांत अवेळी पावसामुळे झालेल्या
शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना ५९६ कोटी २१ लाख रुपये नाशिक, पुणे, अमरावती, नागपूर या विभागातील जिल्ह्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
राशन कार्ड धारकांना मिळणार महिन्याला मोफत राशन आणि ९ हजार
डीबीटीद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी लवकरात लवकर वितरित करण्यात येणार आहे.
मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय शुक्रवारी जारी केला.
जानेवारी ते मे २०२४ या महिन्यांत अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्तांकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाले आहेत.
राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा सुधारित शासन निर्णय [GR] दिनांक 02/08/2024 रोजी जारी
अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे, याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा
अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरितादेखील विहित दराने मदत देण्यात येते.
केंद्र शासनाने विहित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तीव्यतिरिक्त अवेळी पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राचे उधाण व आकस्मिक आग या स्थानिक आपत्तींमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे.