Bandhkam Kamgar Yojana 2024 | गुड न्यूज आत्ताच असा करा अर्ज, आणि मिळवा  मोफत भांडी संच, कुणाला मिळणार लाभ? येथे सविस्तर जाणून घ्या 

By Datta K

Published on:

Bandhkam Kamgar Yojana 2024 | गुड न्यूज आत्ताच असा करा अर्ज, आणि मिळवा  मोफत भांडी संच, कुणाला मिळणार लाभ? येथे सविस्तर जाणून घ्या 

 

Mofat Bhandi Yojana Maharashtra : बांधकाम कामगारांसाठी सरकारकडून अनेक फायदेशीर योजना राबावल्या जात आहेत. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत (Bandhkam Kamgar Bhandi Yojana) सरकारकडून बांधकाम कामगारांना मोफत भांडी संच देण्यात येतो.

तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणी अद्याप तुम्हाला मोफत भांडी योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तो कसा मिळवायचा? बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज कसा करायचा त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात…

 

1.अशी करा बांधकाम कामगार नोंदणी

2. बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज कसा करावा?

 

अनेक बांधकाम कामगारांना सरकारद्वारे त्यांच्यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांबद्दल माहिती नसल्यामुळे ते अशा योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतात. तुम्ही जर बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली असेल तर तुम्हाला सरकारद्वारे राबावल्या जाणाऱ्या 32 योजनांचा लाभ मिळतो.

बांधकाम कामगारांसाठी मोफत भांडी योजना (Free Bhandi Yojana) खूपच फायदेशीर आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील अनेक बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

पण हे लक्षात ठेवा की या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळतो.

 

अशी करा बांधकाम कामगार नोंदणी

 

1: बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी बांधकाम कामगार मंडळाच्या अधिकृत वेबसाईट https://mahabocw.in/ वर जावा.

2: ‘Construction Worker:Registration’ वर क्लिक करा.

3: तुमचा आधार कार्ड नंबर आणी मोबाईल नंबर टाकून ‘Proceed to Form’ वर क्लिक करा.

4: १ रुपया पेमेंट करून अर्ज सक्रीय करा.

मोफत भांडी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम बांधकाम कामगार नोंदणी करणे गरजेचे आहे.

 

बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी अर्ज कसा करावा?

 

बांधकाम कामगार भांडी योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर एक संदेश येतो, जर एकापेक्षा जास्त बांधकाम कामगारांनी मोफत भांडी योजनेसाठी

अर्ज केला असेल तर बांधकाम कामगारांना त्या ठिकाणी बोलविले जाते आणी आधार बायोमेट्रिक केले जाते. आणी तुमचा अर्ज पात्र ठरला तर तुम्हाला बांधकाम कामगार मोफत भांडी योजनेचा लाभ मिळतो.

 

सरकारी योजना, सरकारी नोकरी,विषयी माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा 

 

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews