Rain Update | मोठी बातमी या राज्यात ३ दिवस पावसाचे वातावरण अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता!

By Datta K

Published on:

Rain Update | मोठी बातमी या राज्यात ३ दिवस पावसाचे वातावरण अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता!

 

 

हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिला. पावसावेळी विजा आणि ढगांचा गडगडाटही राहू शकतो, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहीसा अधिक राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

 

 

Pune Rain Update : पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी

 

गुरुवारपासून राज्यातील काही भागात पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे. गुरुवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही काहणी भागात विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

 

बुधवारी कोकण, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसह मराठवाड्यातील बीड आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर गुरुवारी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची उघडीप राहील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews