Bigg Boss | ची ट्रॉफी घेऊन गावाकडच्या शाळेत पोहोचला सूरज भाऊ म्हणाला बाळांनो शिक्षण घ्या मी गरीब होतो पण..!

By Datta K

Published on:

Bigg Boss | ची ट्रॉफी घेऊन गावाकडच्या शाळेत पोहोचला सूरज भाऊ म्हणाला बाळांनो शिक्षण घ्या मी गरीब होतो पण..!

 

Bigg Boss Marathi Suraj Chavan : ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वाची झगमगती ट्रॉफी घेऊन प्रेक्षकांचा लाडका ‘गुलीगत किंग’ आज पहिल्यांदाच त्याच्या मोढवे गावी गेला. गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्राच्या घराघरांत सूरजला मोठ्या प्रमाणात प्रेम मिळालं. ग्रँड फिनालेला सुद्धा त्याला भरभरून वोटिंग करण्यात आलं आणि याची पोचपावती सूरजला ट्रॉफीच्या रुपात मिळाली. ‘बिग बॉस’च्या घरात अनेकदा मला गावची आठवण येतेय असं सूरज म्हणायचा. अखेर ७० दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर हा रीलस्टार त्याच्या गावी परतला आहे.

 

सूरज मोढवे गावचा आहे पण, ट्रॉफी घेऊन आधी खंडोबाला जाणार हे त्याने आधीच मनात पक्क ठरवलं होतं. अगदी ‘बिग बॉस’च्या घरात देखील सूरजने सर्वात आधी जेजुरीला जाईन असं वक्तव्य केलं होतं. अखेर त्याने प्रेक्षकांना दिलेला शब्द खरा ठरवला आहे. जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन त्यानंतर मोरगावच्या मोरेश्वराचे आशीर्वाद घेऊन सूरज आपल्या मोढवे गावी पोहोचला.

 

सूरजचं मोढवे गावी जंगी स्वागत

गावी गेल्यावर सूरजचं ( Bigg Boss Marathi ) जंगी स्वागत करण्यात आलं. गुलालाची उधळण करत या गुलीगत किंगची गावकऱ्यांनी विजयी मिरवणूक काढली. यावेळी ‘झापुक झुपूक’ म्हणत सूरजने डीजेच्या गाण्यांवर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. भव्य मिरवणुकीनंतर गावी पोहोचल्यावर सूरजने सर्वात आधी आपल्या शाळेला भेट दिली.

 

सूरजचा मोढवे गावच्या शाळेत सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थी त्याला पाहून जल्लोष करत होते. सर्वांना उद्देशून सूरज म्हणाला, “बाळांनो खूप शिका, मला शिक्षण मिळालं नाही कारण, मी गरीब होतो. कालांतराने संधी मिळाली त्यानंतर मलाच शिक्षणाची आवड राहिली नाही. इच्छाच नव्हती…मग, मी पळून डोंगरावर जायचो. तुम्ही असं करू नका.”

 

पाहा व्हिडिओ:

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews