soybean bazar dar | गणपती बाप्पा पावला ! सोयाबीन बाजारभावात अचानक मोठी वाढ, सध्या महाराष्ट्रात सोयाबीनला काय भाव मिळतोय हे? पहा..

By Datta K

Published on:

soybean bazar dar | गणपती बाप्पा पावला ! सोयाबीन बाजारभावात अचानक मोठी वाढ, सध्या महाराष्ट्रात सोयाबीनला काय भाव मिळतोय हे? पहा..

दरवर्षी, ऑक्टोबर मध्ये नवीन सोयाबीन बाजारात दाखल होत असतो. काही ठिकाणी सप्टेंबरच्या अखेरीस देखील नवीन माल बाजारात येतो. मात्र सोयाबीनची खरी आवक ही ऑक्टोबर महिन्यातच पाहायला मिळते. यंदाही ऑक्टोबर मध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होणार आहे.

soybean bazar dar : पिवळे सोने म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. चिंतेचा विषय ठरण्याचे कारण असे की गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनला बाजारात अपेक्षित दर मिळत नाहीये. एकीकडे सोयाबीनची एकरी उत्पादकतामध्ये घसरण होत आहे तर दुसरीकडे बाजारात सोयाबीनला अपेक्षित भावही मिळत नाहीये.

 

दरवर्षी, ऑक्टोबर मध्ये नवीन सोयाबीन बाजारात दाखल होत असतो. काही ठिकाणी सप्टेंबरच्या अखेरीस देखील नवीन माल बाजारात येतो. मात्र सोयाबीनची खरी आवक ही ऑक्टोबर महिन्यातच पाहायला मिळते. यंदाही ऑक्टोबर मध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक होणार आहे.

 

गेल्यावर्षी उत्पादित झालेल्या सोयाबीनला खूपच कवडीमोल दर मिळाला आहे. यामुळे यंदा ज्यांनी सोयाबीन लागवड केली आहे त्या शेतकऱ्यांना कसा दर मिळतो ? हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

मात्र नवीन हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल होण्यापूर्वीच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून सोयाबीन बाजार भावात चांगली सुधारणा झाली आहे. सोयाबीन बाजार भावात अचानकच वाढ झाली असल्याने गणपती बाप्पा नवसाला पावला असंच बोलले जात आहे.

 

सोयाबीनला काय दर मिळतोय

 

मिळालेल्या माहितीनुसार, काल सहा सप्टेंबरला अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला ४६०० रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. गेल्या महिन्याभरातील सोयाबीन बाजारभाव बघितले तर कालचे दर हे खूपच अधिक असल्याचे पाहायला मिळतय.

 

त्यामुळे सोयाबीन उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे अकोल्याच्या बाजारात किमान दर देखील 4000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक झाले आहेत.

पण बाजार अभ्यासकांनी बाजारात आलेली ही तेजी क्षणिक असल्याचे म्हटले आहे. सोयाबीन चा नवीन हंगाम पुढील महिन्यात सुरू होणार आहे. नवरात्रीच्या कालावधीत सोयाबीनची आवक खऱ्या अर्थाने वाढणार आहे.

 

मात्र नवीन मालाची आवक बाजारात येण्यापूर्वीच सोयाबीन दरात सुधारणा झाली आहे. कालच्या लिलावात अकोल्याच्या बाजारात सोयाबीनला किमान ४१०० रुपये, कमाल ४७४५ रुपये आणि सरासरी ४६०० रुपयांचा दर मिळाला.

 

गेल्या आठवड्याबाबत बोलायचं झालं तर या बाजारात सोयाबीनचा किमान दर ३८०० रुपयांपर्यंत, कमाल दर ४३०० च्या आतच आणि सरासरी दर ४२०० पर्यंत होता. मात्र, गेल्या तीन दिवसांमध्ये सोयाबीनचे दर सुधारले आहेत.

 

काल तर सोयाबीनला चांगला समाधानकारक भाव मिळाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात सोयाबीनदरात अचानक सुधारणा झाली आहे. पण, ही सुधारणा सट्टा बाजारातील उलाढालींमुळे झाल्याचा कयास आहे. यामुळे हे दर जास्त दिवस टिकणार नाहीत असे वाटत आहे.

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews