Money Making Tips | स्वतंत्रपणे बनणे, एकदाच गुंतवा १ लाख रुपये; नंतर निवांत व्हा मालामाल;
आपल्या सगळ्यांनाच निवृत्तीनंतरच्या आयुष्याची काळजी असते. यासाठी आपण पैशाची बचतही करत असतो. बचतीमध्ये अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करत असतो. पण, सध्या गुंतवणूक करत असताना त्याचा अभ्यास असण महत्वाचे आहे, अभ्यास नसेल तर तुमची गुंतवणूक वाया जाऊ शकते.
जर तुम्ही निवृत्तीवेळी चांगली रक्कम वाचवली तर पुढचे आयुष्य खूप सोपे होऊ शकते. नियमित उत्पन्नासाठी, तुम्हाला कुठेही काम करण्याची किंवा कोणत्याही पेन्शनवर अवलंबून राहण्याची गरज नाही. तुमची निवृत्तीनंतर १ कोटींहून अधिक रक्कम जमा असेल.
कंपाऊंडिंगमुळे तुमची संपत्ती अनेक पटींनी वाढू शकते. त्यानुसार, तुम्ही अशा काही ठिकाणी गुंतवणूक करावी जिथे अधिक रक्कम कंपाऊंडच्या स्वरूपात उपलब्ध असेल. यामध्ये म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही Mutul Funds मध्ये एकरकमी किंवा दर महिन्याला पैसे गुंतवू शकता.
जर तुम्ही वयाच्या २० व्या वर्षी १ लाख रुपये गुंतवले तर तुम्ही ६० वर्षांचे झाल्यावर ही गुंतवणूक जवळपास १०० पटीने वाढून सुमारे १ कोटी रुपये होते. ही वाढ चक्रवाढ दरामुळे होते, कारण तुमचे पैसे ४० वर्षे वाढत राहतात.
जर तुम्ही वयाच्या ३० व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि एक लाख रुपये एकरकमी जमा केले, तर आता १ लाख रुपयांची गुंतवणूक निवृत्तीपर्यंत फक्त ३० पट वाढते, परिणामी वयाच्या ६० व्या वर्षी ३० लाख रुपये होतात.
तुम्ही वयाच्या 40 व्या वर्षी गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्यास, १ लाख रुपये १२% वार्षिक परताव्यासह वयाच्या ६० व्या वर्षी फक्त १० पटीने वाढून १० लाख रुपये होतील.
‘जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितके जास्त पैसे तुम्ही दीर्घकालीन कमवाल. वयाच्या २० व्या वर्षी सुरू झालेली १ लाख रुपयांसारखी छोटी रक्कमही १ कोटी रुपयांच्या संपत्तीत बदलू शकते. त्याच वेळी, वयाच्या ३० आणि ४० व्या वर्षी, १ लाख रुपयांची केलेली गुंतवणूक तुम्हाला लखपती बनवू शकते.