Land Record | 1880 पासूनचे जुने सातबारा आणि फेरफार उतारा मोबाईल वरून डाउनलोड करा फक्त दोन मिनिटांत

By Datta K

Published on:

Land Record | 1880 पासूनचे जुने सातबारा आणि फेरफार उतारा मोबाईल वरून डाउनलोड करा फक्त दोन मिनिटांत

नमस्कार मित्रांनो, जमिनीचे जुने अभिलेख पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. आणि तेथून तुम्हाला जुने अभिलेख पहावे लागतील.

पोर्टल वर जाऊन जुने अभिलेख कसे पाहायचे याची स्टेप खालील प्रमाणे आहे.

सर्वात प्रथम तुम्हाला वेबसाईटवर जायचे आहे

वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या पोर्टलवर पोहचाल.

जुने अभिलेख फेरफार उतारे पाहण्यासाठी तुम्हाला या पोर्टलवर सर्वात प्रथम तुमचे अकाउंट बनवावे लागेल.

Ration Card New Updates | या शिधापत्रिकाधारकांना रेशनच्या बदल्यात 9 हजार रुपये मिळणार 1 ऑगस्ट पासून नवीन नियम लागू

जर तुम्ही या वेबसाईटवर अगोदरच नोंदणी केली असेल तर तुम्ही फेरफार उतारे किंवा अभिलेख Direct लॉगिन करून पाहू शकता.

फेरफार उतारा पाहण्यासाठी तुम्हाला प्रथम जिल्हा निवडायचा आहे.

सध्या डिजिटल फेरफार उतारा पाहण्यासाठी सुविधा फक्त सात जिल्ह्यांसाठी उपलब्ध आहे

संपूर्ण महाराष्ट्रासाठी जेव्हा ही सुविधा उपलब्ध होईल, तेव्हा देखील तुम्ही या पोस्टमध्ये दिलेल्या स्टेप वापरून फेरफार उतारा आणि सातबारा पाहू शकता.

अकोला, अमरावती, धुळे, मुंबई उपनगर, नाशिक पालघर आणि ठाणे या सात जिल्ह्यामध्ये ही सुविधा सध्या उपलब्ध आहे.

लवकरच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

फेरफार उतारा पाहण्यासाठीच्या पुढील स्टेप मध्ये तुम्हाला गावाचे नाव, तालुका आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे.

अभिलेख प्रकारामध्ये तुम्ही फेरफार उतारा, सातबारा 8-अ देखील निवडू शकता.

त्यानंतर तुम्हाला जमिनीचा किंवा शेतीचा गट क्रमांक टाकायचा आहे. आणि Search बटणावर क्लिक करायचे आहे.

Search बटनावर क्लिक केल्यानंतर, तुमच्या स्क्रीनवर फेरफार उतारा संबंधीची संपूर्ण माहिती प्रदर्शित होईल.

स्क्रीनवर तुम्ही तुमच्या जमिनीचा फेरफार उतारा पाहू शकता, सोबतच बाजूला दिलेल्या year Option मध्ये, Specific वर्षाचा फेरफार उतारा पण तुम्ही पाहू शकता.

सोबतच तुम्ही कोणत्याही वर्षाचा फेरफार उतारा Download करू शकता, आणि तुमच्या मोबाईल मध्ये तो Save करू शकता.

कोणतेही डिजिटल Land record हे 1880 पासूनचे उपलब्ध असते, त्यामुळे तुम्ही 1880 च्या अगोदरचे जमिनीचे Record पाहू शकणार नाही.

याच प्रकारे तुम्ही तुमच्या जमिनीचा सातबारा देखील पाहू शकता,

अभिलेखाच्या प्रकारामध्ये इतर प्रकार निवडले असता, ते डॉक्युमेंट देखील तुम्ही अगोदरच्या वर्षाचे पाहू शकता आणि डाऊनलोड पण करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही मोबाईल वरून फेरफार उतारा, सातबारा किंवा 8-अ कोणत्याही वर्षाचा डाऊनलोड करू शकता. तर मित्रांनो ही होती महत्वाची अशी Land record संबंधीची माहिती,

ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला Comment करून कळवा आणि तुमच्या मित्र – मैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा.

लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये 17 ऑगस्टला येणार ! लाभार्थी Pdf यादी येथे डाऊनलोड करा

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews