Aadhaar Card Update | आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी शेवटचे 12 दिवस, अधिकृत नोंदणी केंद्र कसं शोधायचं जाणून घ्या

By Datta K

Published on:

Aadhaar Card Update | आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी शेवटचे 12 दिवस, अधिकृत नोंदणी केंद्र कसं शोधायचं? जाणून घ्या 

मोफत आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शेवटचे 12 दिवस शिल्लक आहेत. अधिकृत आधार नोंदणी केंद्र कसं शोधायचं या बाबत आपण माहिती घेणार आहोत.

आधार कार्ड (Aadhaar Card) धारकांना अनेक कारणांसाठी त्यामधील माहिती दुरुस्ती करायची असते. अनेकदा काही जणांचा पत्ता बदलेला असतो. काही जणांच्या नावात बदल झालेला असतो. तर, अनेकांची जन्मतारीख नोंदवायची राहून गेलेली असते. यासाठी आधार कार्ड नोंदणी केंद्रामध्ये (Aadhaar Enrollment Center) जाण्याची गरज असते. याशिवाय यूआयडीएआयनं ज्यांचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं झालेलं आहे त्यांना ते अपडेट करुन घेणं बंधनकारक केलं आहे. आधार कार्डमधील बायोमेट्रिक डिटेल्स मोफत अपडेट करण्यासाठी 14 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आधार नोंदणी केंद्रात जावं लागतं. हे आधार नोंदणी केंद्र कसं शोधायचं हे आज जाणून घेणार आहेत

आधार नोंदणी केंद्र शोधण्यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत. तुम्हाला प्रथम यासाठी यूनिक आयडेंटीफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या https://appointments.uidai.gov.in/easearch.aspx या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे. या वेबसाईटला भेट दिल्यानंतर आधार नोंदणी केंद्र शोधण्यासाठी राज्य, पोस्टल पिनकोड आणि सर्च बॉक्स या तीन पर्यायांचा वापर करता

राज्य हा पर्याय निवडल्यास तुम्हाला प्रथम राज्य निवडावे लागेल. इथं आधार कार्ड धारक महाराष्ट्रातील असल्यास तुम्हाला महाराष्ट्र निवडावे लागेल. त्यानंतर जिल्हा, उपविभाग किंवा तालुका, गाव, शहर नोंदवा, यानंतर कायम स्वरुपी नोंदणी केंद्र दाखवा या चेक बॉक्सवर क्लिक करावं लागेल, यानंतर कॅप्चा कोड नोंदवून तुम्ही तुमच्या जवळचं आधार नोंदणी केंद्र कोणतं आहे ते पाहू शकता.

पोस्टल पिनकोड पर्यायाचा वापर केल्यास तुम्हाला तुम्ही राहता त्या ठिकाणाचा सहा अंकी पिनकोड आधार च्या वेबसाईटवर नोंदवावा लागेल. यानंतर कॅप्चा क्रमांक नोंदवून आधार नोंदणी केंद्र शोधता येईल.

सर्च बॉक्स हा पर्याय निवडल्यास तुम्हाला तुमच्या गावाचं किंवा शहराचं नाव नोंदवाव लागेल. यानंतर कॅप्चा कोड नोंदवून तुम्ही आधार नोंदणी केंद्र शोधता येईल.

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews