Viral Video:उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील सरकारी शाळेत एक संतापजनक प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सरकारी शाळेत कर्मचाऱ्यांना हजेरी लावण्यासाठी डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आली होती.
मात्र त्यात त्रुटी आढळल्यानंतर पुन्हा एकदा जुनी पद्धत सुरू करण्यात आली. जुन्या पद्धतीनुसार ज्येष्ठ शिक्षक इतरांची हजेरी लावत आहेत. सध्या उन्नाव मधील एका सरकारी शाळेतील व्हिडीओ व्हायरल होत आहे.
ज्यामध्ये महिला शिक्षिकेची हजेरी लावण्यासाठी पुरूष शिक्षक तिच्याकडे गालावर चुंबन देण्याची मागणी करत आहे. तर शिक्षिका यासाठी स्पष्ट नकार देत असल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून समोर आले आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?
सोशल मीडियावर २६ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये वरिष्ठ शिक्षक महिला शिक्षिकेला सांगतो की, तिने जर त्याची अट मान्य केली तर तिच्यासाठी सर्व काही सोपं होईल.
“तुझ्या हजेरीचा विषय मी सांभाळून घेईल”, असेही हा शिक्षक महिलेला सांगतो. महिला शिक्षक त्याला याबद्दल कोणती अट आहे? असा प्रश्न विचारते. त्यानंतर पुरूष शिक्षक आपल्या गालावर इशारा करून तिच्याकडून चुंबन मिळावे, अशी मागणी करतो.
शिक्षकाच्या या अश्लाघ्य मागणीनंतर महिला शिक्षिका त्याला साफ नकार देते. “मी यासाठी तयार नाही, ही घाणेरडी गोष्ट आहे”, अशा शब्दात महिला शिक्षिका सदर शिक्षकाला सुनावते. यानंतरही समोरचा शिक्षक निलाजरेपणा दाखवत हसताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओ खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा
https://x.com/MamtaTripathi80/status/1821192098915271048