Bangladesh Viral Video:बांगलादेशातील अलीकडील अशांततेमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक दिशाभूल करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत.
लाइटहाऊस जर्नलिझमला अशीच एक पोस्ट आढळली, ज्यात एका तरुणीचे हात- पाय बांधलेले होते आणि ती सार्वजनिक ठिकाणी बसली होती, तिच्या तोंडावर टेपही चिकटवलेली दिसली.
व्हिडीओमध्ये एक व्यक्ती व्हिडीओ कॅमेरा घेऊन जात असल्याचेही त्यात दिसतेय. शेख हसीना यांचे सरकार पाडल्यानंतर बांगलादेशी हिंदूंवर अशाप्रकारे अत्याचार केले जात असल्याचा दावा.
या व्हिडीओ पोस्टद्वारे करण्यात आला आहे. पण, आम्ही व्हिडीओची पडताळणी केली असता त्यामागची सत्य माहिती समोर आली आहे. हे सत्य नेमकं काय आहे जाणून घेऊ
तुमच्या अफवांमुळे मुलगी आज मानसिक आघातातून जात आहे. ही मुलगी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात बांगलादेशातील जगन्नाथ विद्यापीठाची नियमित विद्यार्थिनी आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या अवंतिकाच्या आत्महत्येचा निषेध दर्शवण्यासाठी केलेल्या पथनाट्याचा हा व्हिडीओ आहे.
https://x.com/jpsin1/status/1821099377236029699