Ladki Bahin Yojana Beneficiary List:पाठीमागील तीन दिवसापासून लाडकी बहीण योजनेकरता पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यावरती थेट रक्कम जमा होत आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्य सरकार मार्फत लाडकी बहीण पात्र असलेल्या महिलांच्या एकूण 80 लाख महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा झाले आहेत.
तसेच आज सरकारमार्फत अजून सव्वा लाख पात्र महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये जमा केले आहेत.
ही माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय श्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या हप्ते सध्या महिलांच्या खात्यावर वितरित केले जात आहेत.
आज सकाळपासून 16 लाख 35 हजार भगिनींच्या खात्यात 3000 रुपये लाभ जमा झाला आहे.
याच्या अगोदर 80 लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे जमा केले आहेत.
येथे क्लिक करून तुमचे नाव तपासा
आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार एकूण 96 लाख 35 हजार महिलांच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले गेले आहेत.अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली.
15 ऑगस्ट रोजी 48 लाख महिलांना लाभ दिला गेला आहे.
दिनांक 14 ऑगस्ट रोजी 32 लाख महिलांना तर 15 ऑगस्ट रोजी 48 लाख महिलांना या योजनेचा लाभ दिला गेला आहे.
31 जुलैपर्यंत अर्ज मंजूर झालेल्या महिलांच्या बँक खात्यावर सध्या 3000 रुपये जमा केले जाणार आहेत.
नंतर हळूहळू सर्व महिलांच्या बँक खात्यावर पैसे पाठवले जातील.
योजनेची अंतिम तारीख काय?
लाडकी बहीण योजनेकरिता अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑगस्ट हा होता परंतु बालविकास मंत्री यांनी सांगितलेल्या माहितीनुसार 31 ऑगस्ट नंतर देखील महिलांना अर्ज करता येणार आहेत.