Annasaheb Patil Loan Scheme:अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ” या योजनेकरीता मागणी क्र.ओ-१० मुख्य लेखाशिर्ष “४२५०” अंतर्गत रु.३०.०० कोटी इतका निधी वितरीत करण्याबाबत.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ” हा विषय कौशल्य विकास व उद्योजकता विभाग या विभागाकडून सामान्य प्रशासन विभागाच्या दि.०९.०९.२०२१ च्या आदेशान्वये नियोजन विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे.
मोठी बातमी राज्यातील सर्व जनतेला टोल माफी जाहीर | Toll Tax Free News
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या १) वैयक्तिक व्याज कर्ज परतावा योजना (IR-1) व गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) या योजनांच्या सुयोग्य अंमलबजावणी करिता रु. २७५.०० कोटीचे दायित्व (Libility) लाभार्थ्याप्रती महामंडळाचे आहे व हे दायित्व कालानुरुप वाढत्या स्वरुपाचे आहे.
सन २०२२-२३ साठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास रु. १००.०० कोटी इतके अनुदान अर्थसंकल्पित केले आहे.
त्याअनुषंगाने रु.३०.०० कोटी इतका निधी वित्त विभागाच्या मान्यतेने वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे.
शासन निर्णय:
नियोजन विभागाच्या अधिनस्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळास रुपये १००.०० कोटी इतके अनुदान सन २०२२-२३ साठी अर्थसंकल्पित केले आहे.
त्यातील रु.३०.०० कोटी इतके अनुदान वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन दिले आहे.
सदर निधी अंतर्गत होणारा खर्च अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने खालील लेखाशीर्षाखाली भागवावा. मागणी क्र.ओ-१०
लेखाशिर्ष ४२१५ इतर सामाजिक सेवा यावरील भांडवली खर्च
२- (००) १९० सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणुका
(००) (०१) अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित यास भांडवली अंशदान कार्यक्रम / दत्तमत संगणक सांकेतांक क्रमांक (४२५०० से ०७२) ३२, अंशदाने
प्रस्तुत अनुदान वितरीत करण्यासाठी ” नियंत्रक अधिकारी” म्हणून उपसचिव (रोखशाखा) व “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून कक्ष अधिकारी (रोखशाखा) यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांनी होणाऱ्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास वेळोवेळी सादर करावे.
तसेच होणारा खर्च ज्या उद्दिष्टाखाली अनुदान मंजूर केले आहे. त्या उद्दिष्टाकरिताच खर्च करण्याची दक्षता घ्यावी.
प्रस्तुत शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.२३०/२२२/व्यय-८. दि.२४/०६/२०२२ अन्वये दिलेल्या संमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हा शासन निर्णय उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्र. २०२२०७०८१६३५२६४०१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कोण आहेत पात्र?
मराठा प्रवर्गातील व्यक्ती किंवा अशा व्यक्ती ज्या व्यक्तींसाठी कोणतेही मंडळ कार्यरत नाही अशा व्यक्ती अण्णासाहेब पाटील कर्ज annasaheb patil loan scheme योजनेसाठी पात्र आहेत.
ऑनलाइन अर्ज येथे करा
किती मिळणार बिनव्याजी कर्ज?
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत व्यवसाय सुरु करण्यासाठी सुरुवातील १० हजार नंतर ५० हजार आणि शेवटी १ लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.
यासाठी अट अशी आहे कि सर्व कर्ज नियमित फेडणे गरजेचे आहे तेंव्हाच कर्ज रक्कम वाढत जाईल.
कोठे करावा अर्ज?
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील केला जातो.ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील माहिती देखील या लेखात दिलेली आहे.