खुशखबर अखेर या जिल्ह्यांना नुकसान भरपाई मंजूर ! शासन निर्णय पहा

By Datta K

Published on:

Flood Damage Compensation:राज्यात सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याबाबत…

राज्यात सन २०२० ते २०२२ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे व इतर मालमत्तेचे नुकसान झाल्याचे निर्दशनास आले होते.

त्याप्रमाणे विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांच्या अनुषंगाने वेळोवेळी निधी वितरीत करण्यात आला आहे.

तथापि, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे तसेच इतर काही कारणांमुळे निधी मागणीच्या काही प्रस्तावांवर कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आले होते.

त्यामुळे शेतीपिकांच्या व इतर नुकसानीसाठी आवश्यक असलेल्या मदतीचे प्रस्ताव शासनास पाठविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या.

त्याप्रमाणे सर्व विभागीय आयुक्त यांचे कडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार वर नमूद दि.०५.०६.२०२३ च्या शासन निर्णयाव्दारे रु.४०१७०,७० लक्ष इतक्या रक्कमेच्या निधी वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे.

तथापि, त्यानंतरही सर्व विभागीय आयुक्त यांचेकडुन संदर्भाधीन क्र.७ ते ३१ येथील पत्रान्वये प्राप्त झालेले निधी मागणीचे प्रस्ताव प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले आहे.

हे प्रस्ताव मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्य कार्यकारी समितीच्या दि.०२.११.२०२३ रोजी झालेल्या बैठकीत निर्णयार्थ ठेवण्यात आले होते.

या बैठकीतील निर्णयानुसार बाधितांना मदत देण्यासाठी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय पहा 

 

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews