दहावी,बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ! संपूर्ण वेळापत्रक येथे पहा

By Datta K

Published on:

SSC-HSC Board Exam 2024:राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांचे

संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले असून, यंदा प्रथमच दोन्ही परीक्षा नियोजित तारखेपेक्षा ८ ते १० दिवस अगोदर होणार आहेत.

बारावीची लेखी परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ ते १८ मार्च २०२५ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च २०२५ या कालावधीत होणार आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या तयारीच्या दृष्टीने राज्य मंडळाकडून दरवर्षी परीक्षेच्या तारखा ५ ते ६ महिने अगोदर जाहीर केल्या जातात.

राशन कार्ड धारकांना या १० वस्तू मिळणार मोफत, नवीन नियम लागू | Ration Card News

त्यानुसार फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये आयोजित परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेशप्रक्रिया वेळेत होण्यासाठी, तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या तयारीला विद्यार्थ्यांना परेसा वेळ मिळावा ओक

यासाठी यंदापासून दोन्ही परीक्षा ८ ते १० दिवस लवकर होत आहेत.

बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

दहावीची प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा ३ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.

प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा व लेखी परीक्षेचे सविस्तर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल.

या संभाव्य वेळापत्रकावर सूचना, हरकती मांडण्यासाठी २३ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मंडळाच्या संकेतस्थळावर या सूचना पाठवायच्या आहेत. निर्धारित वेळेनंतर येणाऱ्या सूचनांचा विचार केला जाणार नाही, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा यांनी दिली.

Mazi Ladki Bahin Yojana | या महिलांना लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मिळणार नाहीत संपूर्ण माहिती पहा

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews