लाडकी बहिणींच्या खात्यावरती जमा झाला पहिला 1 रुपया ! 3 हजार रुपये या तारखेला जमा होणार

By Datta K

Published on:

Ladki Bahin Yojana 1st Payment:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना मदतीचा पहिला हप्ता लवकरच देण्यात येणार आहे.

यासाठी लाडक्या बहिणींना लाभ हस्तांतरणाची गुरूवारी यशस्वीपणे चाचणी करण्यात आली.

राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविली जात असून ही चाचणी यशस्वी ठरल्याचे मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.

जुन्या पेन्शन योजनेवर मोठी बातमी,संपूर्ण माहिती येथे पहा | Old Pension Scheme News

आतापर्यंत १ कोटी ३० लाख २९ हजार ९८० अर्ज या योजनेसाठी पात्र झाले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी शेवटच्या टप्प्यात असून १६ व १७ ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण करण्याचा सरकारचा मानस आहे.

अशी माहिती तटकरे यांनी आपल्या एक्स पोस्टव्दारे दिली.ही केवळ एक तांत्रिक पडताळणी असून याबद्दल कोणत्याही गैरसमज किंवा अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

पुण्यात सर्वाधिक, सिंधुदुर्गात सर्वात कमी अर्ज

महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या महत्वाकांशी योजनेला महाराष्ट्रातील माता-भगिनींचा प्रचंड प्रतिसाद लाभला असून आतापर्यंत १ कोटी ४१ लाख ९८ हजार ८९८ महिलांनी योजनेसाठी नाव नोंदणी केली आहे.

प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी सुरु असून आतापर्यंत १ कोटी ३० लाख २९ हजार ९८० अर्ज पात्र झाले आहे, असे तटकरे यांनी म्हटले आहे.

नियमित कर्जदारांना मोठा दिलासा ५०,००० अनुदान येणार खात्यात

त्यांनी आपल्या एक्स पोस्टवर

जिल्हानिहाय प्राप्त अर्जाची आकडेवारीही जाहीर केली आहे. यानुसार सर्वाधिक ९ लाख ७३ हजार ६३ अर्ज पुणे जिल्ह्यात,

नाशिक जिल्ह्यात ७ लाख ३७ हजार ७०८, अहिल्यानगर जिल्ह्यात ७ लाख ८ हजार ९४८ अर्ज प्राप्त झाले आहेत.

सर्वात कमी १ लाख ५० हजार ४७८ अर्ज सिंधुदुर्गात तर त्यापेक्षा थोडे अधिक १ लाख ५६ हजार ३३५ अर्ज गडचिरोली जिल्ह्यात प्राप्त झाले आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यात १ लाख ७३ हजार १९१ अर्ज प्राप्त झाले आहेत.

जिल्हा अर्जाची संख्या

• पुणे 9,73,063

• नाशिक ७,३७,७०८

• अहिल्यानगर 7,08,948

• कोल्हापूर ६, ९६, ०७३

• सोलापूर ६,१४,९६२

• सातारा ५,३०,८२८

• सांगली ४,५९,८३६

• संभाजीनगर 5,41,554

• मुंबई उपनगर 3,85,886

• रायगड :३,८५,८८६

•मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या योजनेत आतापर्यंत मुंबई शहरात एक लाख ३० हजार ९७१ अर्ज पात्र झाले.

त्यामध्ये एक लाख ६९ हजार २८ महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

प्री-वेडिंग शूटसाठी गोव्याला एक रात्र दोघांचा मुक्काम पहाटे उठल्यावर मात्र ‘तू पाहिजे तशी नाहीस’ म्हणत मोडले लग्न

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews