नियमित कर्जदारांना मोठा दिलासा ५०,००० अनुदान येणार खात्यात

By Datta K

Published on:

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर) (कार्यक्रम) योजनेसाठी निधी वितरीत करणेबाबत.

सन २०२२ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन २०२२-२३ या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती.

त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. ५० हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देणेबाबत संदर्भ क्र. १, दिनांक २९.०७.२०२२ अन्वये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर) (कार्यक्रम) (२४३५ ०१८९१, ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी रु. ४७००,०० कोटीच्या पुरवणी मागणीच्या प्रस्तावास वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक ३. दिनांक २९.०८.२०२२ तसेच सहकार विभागाच्या संदर्भ क्रमांक ४. दिनांक ३०.०८.२०२२ च्या शा. नि. अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

त्यापैकी रु. २३५०,०० कोटी इतकी रक्कम संदर्भ क्रमांक ५. दिनांक १६.०९.२०२२ रोजीच्या शा.नि. अन्वये तसेच रु. ६५०.०० कोटी इतकी रक्कम संदर्भ क्रमांक ६. दिनांक १८.१०.२०२२ रोजीच्या शा. नि. अन्वये वितरीत करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांचे संदर्भाधीन क्र. ७. दिनांक २०.१२.२०२२ च्या पत्रान्वये उर्वरीत रक्कम वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews