Crime News:लग्नाआधी (प्री-वेडिंग) शूट करण्याचा ट्रेण्ड सगळीकडे पसरत असताना चिखली तालुक्यात या प्रकारातून लग्न मौडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
होणाऱ्या नवन्यासोबत तरुणी प्री-वेडिंग शूटसाठी गोव्याला गेली होती. एक रात्र दोघांचा एकाच खोलीत मुक्काम झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर नवरदेवाने मला तुझ्याशी लग्न करायचे नसल्याचे सांगत लग्न मौडल्याचे सांगितले.
मला जशी हवी होती तशी तू नाहीस, असे त्याने सांगितले. या प्रकारामुळे नवरी अन् तिच्या
कुटुंबाला मात्र प्रचंड धक्का बसला आहे. अजून याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल झाली नसून, या प्रकरणावर सामाजिक स्थरावर तोडगा काढण्याचा प्रयत्न दोन्ही पक्षांकडून सुरू आहे.
विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय तरुणीचे तालुक्यातीलच एका २५
वर्षीय तरुणाशी लग्न ठरले. जानेवारी महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला.
ट्रेन रुळावरून घसरली आणि थेट शेतात घुसले अपघाताच्या घटनेचा थरारक व्हिडीओ नेमका कुठला आहे,ते सविस्तर पाहा
मुलगा इंजिनियर असून, पुण्यात एका कंपनीत नोकरी करतो. मात्र, कोरोना काळापासून त्याचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे.
साखरपुडा झाल्यानंतर तरुणाने होणाऱ्या बायकोला महागडा मोबाईल घेऊन दिला. त्यावर ते दोघे तासंतास गप्पा मारत होते.
दरम्यान, एप्रिल महिन्यात तरुण, तरुणीची एक जवळची नात्यातली मैत्रिण अन् दोन फोटोग्राफर असे ५ जण कारने गोव्याला प्री-वेडिंग शूट करण्यासाठी गेले होते.
दिवसभर फोटो आणि व्हिडिओ शूट केल्यावर त्यांनी रात्री एका हॉटेलात जेवण केले व रूम बुक करून मुक्काम केला.
तिच्या मैत्रिणीसाठी व तिच्यासाठी एक स्पेशल रूम, फोटोग्राफरसाठी एक रूम आणि तरुणाची एक स्पेशल रूम अशा तीन रूम बुक करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, रात्री तरुणाने होणाऱ्या बायकोला त्याच्या खोलीत बोलावले व दोघांनी सोबत मुक्काम केला.
आतापर्यंत प्रेमाने वागणारा तिचा होणारा नवरा झोपेतून उठल्यावर बदलला होता.
त्याने तिथेच तिचा महागडा मोबाईल फोडला. स्वतःच्या अंगावरील कपडे फाडले, मला तू जशी हवी तशी नाहीस, असे म्हणत त्याने आदळआपट केली अन् आता आपले लग्न मोडले, अशी घोषणा केली.
सामाजिकस्तरावर तोडगा काढण्याचा प्रयत्न
घाबरलेली तरुणी मैत्रिणीसोबत कशीबशी घरी पोहोचली व आई-वडिलांना हा प्रकार सांगितल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
असे असले तरी त्यांनी तक्रार देण्याचे टाळले असून, सामाजिक पातळीवर प्रकरणाचा निपटारा करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूनी सुरू आहेत.