आनंदाची बातमी सोन्याचे दर 2000 रुपयांनी घसरले ! नविन दर पहा | Gold Price News

By Datta K

Published on:

Gold Price News:जागतिक मंदीच्या शक्यतेने सोमवारी जगातील सर्वच शेअर बाजार दणकून आपटले.

त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवरही झाला. मुंबईत मंगळवारी सराफ बाजारात सोने प्रतितोळे दोन हजार रुपयांनी घसरले.

त्यामुळे सराफ बाजारात सोने खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी झाली.नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विवाहसोहळ्यासाठी सोने खरेदी केले जात आहे.

तरुणाने मजूरांचा त्रास केला कमी! डोक्यावर माती वाहून नेण्यासाठी शोधला भन्नाट जुगाड, पाहा Viral Video

तर काही ग्राहकांनी ऑर्डरनुसार दागिने बनविण्यासाठी दिले आहेत. यामुळे गावी गेलेल्या चार हजारांहून अधिक कारागिरांना पुन्हा सराफ मालकांना मुंबईत बोलावून घेतले आहे.

सोमवारी सोने प्रतितोळे ७३८०० रुपये होते. ते मंगळवारी ७१८०० रुपये झाले.

यामुळे सराफ बाजारात सकाळपासून मोठ्या प्रमाणावर नोव्हेंबरमध्ये असलेल्या लग्नसराईची श्रावणातच ग्राहकांनी खरेदीला सुरुवात केली.

दररोज २०० कोटींचे सोने विक्री होत असल्याची माहिती कुमार जैन यांनी दिली.

त्याचबरोबर सोन्याची मोडही मोठ्या प्रमाणात सराफ बाजारात येत असून मोड मोडून नवीन दागिना घडवला जात आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये मोड देऊन मोठ्या प्रमाणात दागिने बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अनेक ग्राहकांनी ऑर्डर दिल्याने त्यानुसार दागिना घडवून दिला जाणार आहे, असे जैन यांनी सांगितले.

आजपासून तीन दिवसांचे ज्वेलरी प्रदर्शन

• बुधवारपासून मुंबई गोरेगाव येथे तीन दिवसीय इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी शोचे आयोजन केले यावेळी असून १५० स्टॉल लावले जाणार आहेत.

डायमंडपासून सोन्याचे दागिने या शोमध्ये असणार आहेत. यामध्ये तीन दिवसात ३७०० कोटींची उलाढाल होण्याची शक्यता

इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीशी बोलताना दिली.

SBI Bank Scheme | एसबीआय बँकेमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी हा फॉर्म भरा खात्यात 11,000 ररुपये जमा होतील

Datta K

Related Post

Leave a Comment

Close Visit agrinews