Mp Land Record | घंट्याचे काम मिनिटांमध्ये करा गट नंबर टाकून आपल्या शेत जमिनीचा नकाशा पहा मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने
नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी नवीन रस्ता तयार करायचा असेल किंवा शेत जमिनीची हद्द पहायची असेल तर शेतकऱ्याकडे शेत जमिनीचा नकाशा असणे आवश्यक आहे.
तरी आज आपण या लेखात आपल्या शेत जमिनीचा नकाशा मोबाईल वरती ऑनलाईन कसा पाहायचा ? या विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. mp land record
जमिनीचा नकाशा मोबाईलवर कसा पाहायचा ?
प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये महाभुमी ही वेबसाईट उघडावी लागेल. महाभुमी वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे.
वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला वर डाव्या बाजूस तीन आडव्या रेषा दिसत असतील. त्यावरती क्लिक करायचे आहे.
क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक रकाना येईल.
आता तुम्हाला तुमचं राज्य, जिल्हा, तालुका व गाव निवडून घ्यायचं आहे.
त्यानंतर त्याखाली तुमच्या जमिनीचा जो गट नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे.
आता तुमच्या समोर तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होईल.
तर अशा पद्धतीने आपण जमिनीचा नकाशा मोबाईलवर ऑनलाइन पाहू शकतो.